निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित 'घे भरारी बाल वैज्ञानिक सामान्य ज्ञान राज्यस्तरीय परीक्षा' ही विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक वृत्तीला चालना देणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
संशोधनात्मक वृत्ती आणि ज्ञानाचा नवा प्रवास!
विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने 'घे भरारी बाल वैज्ञानिक सामान्य ज्ञान राज्यस्तरीय परीक्षा' आयोजन करण्यात येते. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची गोडी लागावी आणि भविष्यातील आव्हानांसाठी त्यांनी सज्ज व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
Ø पात्रता:
'घे भरारी बाल वैज्ञानिक सामान्य ज्ञान राज्यस्तरीय परीक्षा' - इ. बालवाडी (KG) ते ८ वी
'घे भरारी बाल वैज्ञानिक सामान्य ज्ञान राज्यस्तरीय परीक्षा' - इ. ५ वी ते इ. ८ वी पर्यंतच्या सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी
Ø संशोधनात्मक वृत्ती: विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि तर्कशक्तीला (Logical Reasoning) चालना देणारे प्रश्न. केवळ पाठांतर नव्हे, तर विज्ञानातील संकल्पना समजून घेण्यावर भर.
Ø अभ्यासक्रम: शालेय पाठ्यपुस्तकावर आधारित विज्ञान आणि चालू घडामोडींवर आधारित सामान्यज्ञान.
Ø सर्वांगीण विकास: केवळ विज्ञानच नव्हे, तर चालू घडामोडी आणि सामान्यज्ञानावर आधारित अभ्यासक्रम.