निफाड एज्युकेशन ॲन्ड सोशल फाउंडेशन, निफाड द्वारे आयोजित परीक्षेसाठी खालील नियम व अटी लागू राहतील:
विद्यार्थ्यांनी नोंदणी फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती अचूक व सत्य असावी. चुकीची माहिती आढळल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
परीक्षेचे हॉल तिकीट व केंद्र ठरलेल्या वेळापत्रकानुसार उपलब्ध केले जाईल. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी ३० मिनिटे आधी केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
परीक्षेचे वेळापत्रक, नियम किंवा पारितोषिकांमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचे सर्व अधिकार निफाड एज्युकेशन ॲन्ड सोशल फाउंडेशनकडे राखीव राहतील.